यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ ऑक्टोबर २४ शुक्रवार
ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले असून डांभुर्णी तालुका यावल येथील सोनवणे परिवारातील सदस्य चंद्रशेखर निंबाजीराव सोनवणे यांना यंदाचा शासनाच्यावतीने दिला जाणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ग्रामसेवक चंद्रशेखर सोनवणे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन व स्वागत करीत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्यात.चंद्रशेखर हे पिंपळे बू॥ या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असुन चोपडा येथे वास्त्यवास आहेत.सेवानिवृत्त आदर्श शिक्षक निंबाजी काका सोनवणे यांचे ते चिरंजीव तसेच आपल्या गावाचे भूषण सहायक पोलीस आयुक्त दिनेश सोनवणे (मुंबई पोलीस) यांचे ते बंधू चंद्रशेखर सोनवणे यांना संदीप निंबाजी पाटील (सोनवणे) तसेच सोनवणे परिवार व डांभुर्णी ग्रामस्थ स्वयंदीप प्रतिष्ठान जळगाव जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांनी स्वागत करीत अभिनंदन केले आहे.