विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०५ ऑक्टोबर २४ शनिवार
नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाने गरजेपोटी घरांबाबत मा.मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाबाबत सहसचिव सुबाराव शिंदे ( ज्यांनी जीआर वर सही केली आहे ते )नगरविकास विभाग,महाराष्ट्र शासन यांचे सोबत बैठक झाली.नवी मुंबई शहरी क्षेत्रातील तसेच ९५ गावातील विस्तारित गावठाणातील मिळकतींना मालकी हक्क ( फ्री होल्ड ) देण्याबाबत सरकारचा निर्णय झाला आहे.अंतिम शासन निर्णय( GR) लवकरच येत्या काही दिवसात जारी करण्यात येईल असे सुब्बाराव शिंदे यांनी नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाच्या शिष्टमंडळाला सांगितले.
११ मार्च २०२४ आझाद मैदान येथील विराट मोर्च्या तील मालकी हक्का बाबतची प्रमुख मागणी अंतिम निर्णया पर्यंत पोहचल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद आणि उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच महासंघाच्या इतर दोन मागण्या १२.५० टक्के भूखंडातून वजा केलेले बांधकाम क्षेत्र कुठलीही वजावट न करता पूर्ण टी डी आर स्वरूपात देण्याचे मान्य झाले आहे व घराबाजूचे अंगण आणि परिसर मालकी हक्काने (फ्री होल्ड ) मिळणार आहे तसेच प्रकल्पग्रस्तांची गावठाणा बाहेरील घरासह अस्तित्वात असलेली घरे क्लस्टर योजनेत सामाविस्ट केली जाणार नाहीत.या मागण्या मान्य झाल्या आहेत.गुरूवार दि.३/१०/२०२४ रोजी मंत्रालयातील अधिकाऱ्यांची नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.यावेळी अध्यक्ष भूषण पाटील,कार्याध्यक्ष दिपक पाटील,सरचिटणीस सुधाकर पाटील,खजिनदार अरविंद घरत,प्रा.राजेंद्र मढवी,रघुनाथ पाटील,प्रताप पाटील,प्रकाश पाटील,राज पाटील,नितेश वैती इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.