विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) ;-
दि.०७ ऑक्टोबर २४ सोमवार
ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अभिनव सेवाभावी संस्था विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे.नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून चिरनेर परिसरातील अबालवृद्धा बरोबर महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबीराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.अशा अभिनव सेवा भावी संस्थेचा आदर्श इतर संस्थांनी अंगीकारणे गरजेचे असून सर्वांनी महिलांचा मान सन्मान राखणे आवश्यक आहे असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी चिरनेर येथे बोलताना व्यक्त केले.अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन चिरनेर गावातील श्रीराम मंदिरात करण्यात आले आहे.या वर्षी ३३ वा नवरात्रौत्सव अभिनव सेवा भावी संस्था सादर करत असून या मंडळांच्या वतीने ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा एक भाग म्हणून काल रविवारी दि.६ ऑक्टोबर रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
या नवरात्रौत्सवाचे व शिबिराचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचा अभिनव सेवा भावी संस्थेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिबिरात पुरुषांबरोबर महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.यावेळी चिरनेर गावचे सरपंच भास्कर मोकल,उद्योजक राजा शेठ खारपाटील,उपसरपंच सचिन घबाडी,माजी सरपंच संतोष चिर्लेकर,अभिनव सेवा भावी संस्थेचे संस्थापक तथा ग्रामपंचायत सदस्य पद्माकर फोफेरकर,महामुंबई चंनलचे संस्थापक मिलिंद खारपाटील, संस्थेचे अध्यक्ष सुनील नारंगी कर,राजेंद्र ठाकूर,रविंद्र भगत,गजानन फोफेरकर,राजेंद्र भगत,जगन्नाथ भगत,जीवन नारंगीकर,माजी सरपंच वसंत चिर्लेकर,ह.भ.प.विश्वास मोकल,सुमन भगत,अनिता नारंगीकर सह संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.