विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०७ ऑक्टोबर २४ सोमवार
पर्यावरण विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीकोणातून व पर्यावरणाचे संरक्षण,संवर्धन करण्याच्या अनुषंगाने काल रविवार दि.६ ऑक्टोबर २४ रोजी ‘डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा’ यांच्या वतीने उरण तालुक्यातील करंजा गावातील नव्याने सुरु झालेल्या मच्छिमार गोदी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मच्छिमार सोसायरी चेअरमन प्रदीप नाखवा,नवापाडा गाव अध्यक्ष मनोहर कोळी,दिलीप कोळी,नारायण नाखवा तसेच इतर सदस्य उपस्थित होते.यावेळी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला.