Just another WordPress site

रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटी आयोजित खेळ पैठणीच्या खेळात शेवंताची उपस्थिती !!

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक

रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.०८ ऑक्टोबर २४ मंगळवार

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने आयोजित उलवे नोड येथील नवरात्र उत्सवात काल दि.६ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या खेळात शंभराहून अधिक महिलांनी सहभाग घेतला.

सदरील खेळ पैठणीच्या खेळात मुख्य आकर्षक होते रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर यांची उपस्थिती होती.अपूर्वा नेमळेकर फक्त उपस्थित राहिल्या नाहीत तर त्यांनी गरबा नृत्याचा आस्वाद घेतला व ठेका धरला.त्यांच्या सहभागाने महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला.त्यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी मोनाली भिलारे,द्वितीय क्रमांक पायल घाडगे,तृतीय क्रमांक संचिता कोळी तर चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी छाया शेट्टी यांना मानाच्या पैठण्या देण्यात आल्या.तर लकी ड्रॉद्वारे चार भाग्यवान महिलांना सेमी पैठण्या देण्यात आल्या.काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या संस्थेमार्फत अतिशय सुरेख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उलवे नोड मधील महिला वर्ग पावसाची तमा न बाळगता या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.