Just another WordPress site

प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी युवा संघटना सोनारीतर्फे आमरण उपोषणाचा इशारा

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक

रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.०८ ऑक्टोबर २४ मंगळवार

उरण तालुक्यातील सोनारी गावची जमीन ही जेएनपीटी या राष्ट्रीय प्रकल्पासाठी संपादित झाली असून सोनारी गाव हे महसूली गाव असल्यामुळे व जेएनपीटी मुळे सोनारी गावच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाले अनेक मोठमोठे प्रकल्प सोनारी गावच्या आजूबाजुच्या परिसरात आले.जेएनपीएच्या माध्यमातून सेझसारखे महत्वकांक्षी प्रकल्प येथे आले आहेत.उद्योगधंद्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक सुद्धा होत आहे मात्र या सर्व प्रक्रियेत ज्या बेरोजगारांनी आपल्या पिकत्या शेतजमीनी विविध प्रकल्पांना,कंपन्याना दिली त्या कंपनीने मात्र स्थानिक प्रकल्पग्रस्त,सुशिक्षित बेरोजगारांना नोकर भरतीत प्राधान्य दिलेच नाही.नेहमी स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरी देऊ रोजगाराच्या संधि देऊ असे सांगून स्थानिक प्रकल्प सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केली आहे परिणामी स्थानिक भूमिपुत्र,प्रकल्पग्रस्त असूनही या कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळून उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे सोनारी गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

सोनारी गावात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सोनारी गावा शेजारी असलेल्या मे.स्पीडी बफर ही कंपनी गेल्या काही महिन्यापासून बंद होती किंबहुना ही कंपनी बंद करण्यात आली व त्यानंतर या कंपनीचा ठेका हे मे.हिंद टर्मिनल प्रा.लिमिटेड या कंपनीला देण्यात आला.या अगोदर या कंपनीत सोनारी गावातील लोक काम करत होते आता मात्र कंपनी प्रशासनाने कोणालाही कामावर घेणार नाही असे कळवले आहे त्यामुळे स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.सोनारी गावातील प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार यांना १५ दिवसाच्या आत न्याय न मिळाल्यास किंवा नोकरी न मिळाल्यास सर्व बेरोजगार युवक युवती हे मे.हिंद टर्मिनस लिमिटेड कंपनी गेटसमोर आमरण उपोषण करतील असा इशारा युवा संघटना सोनारीच्या पदाधिकाऱ्यांनी जेएनपीटी प्रशासन व मे.हिंद टर्मिनल कंपनी प्रशासनाला पत्रव्यवहाराद्वारे दिला आहे.सोनारी गावच्या स्थानिक प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवक युवती वर अन्याय होत असल्याने सदर अन्यायाचे निराकरण करण्यासाठी युवा संघटना सोनारीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार महेशशेठ बालदी,माजी आमदार मनोहरशेठ भोईर,विभागीय आयुक्त कोकण भवन,जिल्हाधिकारी रायगड,तहसीलदार उरण,पोलीस प्रशासन,ग्रामसुधारणा मंडळ सोनारी आदी ठिकाणी पत्रव्यवहार देखील केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.