Just another WordPress site

उरण मध्ये एनएमएमटी चालू करण्याची नागरिकांची मागणी

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक

रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.०९ ऑक्टोबर २४ बुधवार

अनेक महिण्यापासून उरणमध्ये एनएमएमटीची सेवा बंद आहे त्यामुळे नवी मुंबई मध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थी,व्यापारी,नोकरदार, आबालवृद्धाना मोठया संकटाना सामोरे जावे लागत आहे.एनएमएमटी बस सेवा बंद झाल्याने खाजगी वाहनातर्फे लुटालूट चालू आहे शिवाय वेळ व श्रम अधिक खर्च होत आहे.नागरिकांना कामावर तसेच कामावरून घरी पोहोचण्यास विलंब होत आहे.

सदरहू उरण शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच मॉर्निंग कट्टाचे पदाधिकारी व उरणचे जेष्ठ नागरिक या सर्वांनी काल मंगळवार रोजी  महानगरपालिका नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेउन त्यांना उरणमध्ये एनएमएमटी चालू करण्याची मागणी केली.एनएमएमटीची बस सेवा चालू व्हावी या संदर्भात निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात उरणच्या ३०० नागरिकांनी सह्यांची मोहीम करून पाठिंबा दर्शविला. सदर निवेदन स्वीकारून प्रवाशांच्या समस्या लक्षात घेउन नवी मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त कैलास शिंदे यांनी लवकरत लवकर एनएमएमटीची बस सेवा चालू होईल असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.सदर निवेदन देताना उरण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील,अभय वेद पाठक,माजी नगरसेविका आफशा मुकारी,अकबर नदाफ,चंदा मेवती,मोहनसिंग खरवड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.