श्री स्वामी समर्थ संस्था जासईच्या वतीने आश्रम शाळेला स्मार्ट टिव्ही संच,कपाट व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप
विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१० ऑक्टोबर २४ गुरुवार
श्री स्वामी समर्थ बेरोजगार सामाजिक संस्था जासईच्या महिला रणरागिणीनी सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ वैराग,ता.बार्शी संचलित अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा चिरनेर-उरणसाठी एक स्मार्ट टिव्ही संच,एक कपाट भेट देऊन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी साबण,कोलगेट आणि खाऊचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन आज गुरुवारी (दि.१०) संस्थेच्या अध्यक्षा जयश्री सचिन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
जासई परिसरातील प्रकल्पग्रस्त महिलांनी एकत्र येऊन महिला एकत्रिकरण,सक्षमीकरणासाठी पुढाकार घेऊन श्री स्वामी समर्थ बेरोजगार सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे.या संस्थेने सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत चिरनेर येथील आश्रम शाळेसाठी एक स्मार्ट टिव्ही संच,एक कपाट भेट वस्तू स्वरूपात दिली तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना साबण,कोलगेट बरोबर खाऊ चे वाटप हे संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.यावेळी श्री स्वामी समर्थ बेरोजगार सामाजिक संस्था जासई अध्यक्षा जयश्री सचिन ठाकूर यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे व शिस्तबद्ध पद्धतीचे कौतुक केले.या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा प्रिती सं.म्हात्रे,सचिव सरिता योगेश म्हात्रे,खजिनदार स्वाती रंजित पाटील,शोभा धनाजी म्हात्रे,निलम भुषण म्हात्रे,सरिता रमेश म्हात्रे,जयश्री पाटील,जनाबाई घरत,राजश्री म.म्हात्रे,ज्योती वि.घरत,स्मिता सतिश म्हात्रे,पौर्णिमा रत्नेश कांबळे,कामिनी पाटील,लक्ष्मी म्हात्रे सह आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे,उप मुख्याध्यापक रामचंद्र मोरे,महादेव डोईफोडे,शिक्षिका साधना शिंदे,शिवाजी साळुंखे सह इतर शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.