शिवाई सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ उलवे नोड तर्फे विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१० ऑक्टोबर २४ गुरुवार
शिवाई सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ उलवे नोड तर्फे कोपर तलाव शेजारी (शिवाई मैदान),प्लॉट नंबर ९३,सेक्टर ९,उलवे, तालुका पनवेल,जिल्हा रायगड येथे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.यंदाचे नवरात्रौत्सवचे तिसरे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.यानिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा,रक्तदान शिबिर,आरोग्य शिबीर,हळदी कुंकू समारंभ,वेशभूषा स्पर्धा आदी स्पर्धां मध्ये महिला व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.दररोज रात्री गरबा दांडियाला मोठ्या प्रमाणात जनतेची उपस्थिती असते.विविध स्पर्धा उपक्रमाचे नागरिकांनी,भाविक भक्तांनी कौतुक करत समाधान व्यक्त केला. चांगल्या उपक्रमाचे,कार्यक्रमाचे आयोजन केल्याने नागरिकांनी मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत सर्वांचे आभार मानले.सदर मंडळाला माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी भेट दिली.देवीचे दर्शन घेउन मनोहरशेठ भोईर यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या.
सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना व अंगीकृत संघटना उलवे नोड,गव्हाण विभागच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.मंडळाचे सल्लागार व उलवे शहर प्रमुख गौरव म्हात्रे,अध्यक्ष अशोक घरत, उपाध्यक्ष निलेश पाटील,उपाध्यक्ष विनोद पाटील,सचिव शान पाटील,उपसचिव विकास खंडागळे,उपसचिव सुयोग कोळी, खजिनदार श्रीधर पाटील,सहखजिनदार प्रतीक घरत,सदस्य हन्नान पाटणकर,राजेश सिंघ,निलेश म्हादे,नावेद कपाडी,शेखर पाटील, हितेश सिंघ,राजेंद्र म्हात्रे,असिफ शेख,विनायक वाकचौरे,सम्राट घरत, अनिल घरत, आवर्षण कोळी आदी मंडळाचे पदाधिकारी सदस्य विविध स्पर्धा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.