यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ ऑक्टोबर २४ शुक्रवार
तालुक्यातील चुंचाळे येथे बऱ्याच दिवसापासून अवैध दारू मोठ्या प्रमाणात विकली जात होती अखेर ग्रामस्थ मुबारक तडवी यांनी ५ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज केला होता व ९ ऑक्टोंबरपर्यंत दारूबंदी नाही झाली तर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन सरपंच तसेच उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य यांनी सदर अर्जाची गांभीर्याने दखल घेतली असून गावात दारूबंदी करण्यात यावी असे ८ ऑक्टोंबरच्या मासिक सभेत ठराव सर्वानुमते करण्यात आला.तरी १० ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसू नये अशी विनंती केली.
सदर ठराव दारूबंदी विभाग जळगाव,पोलीस स्टेशन यावल व पंचायत समिती यावल येथे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल तरी आपण आपले उपोषण मागे घेऊन ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे असे ग्रामपंचायतीने मुबारक तडवी यांना पत्र दिले म्हणून त्यांनी उपोषणास न बसण्याचा निर्णय घेतला आहे तरी सर्व गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.