यावल येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने ‘खान्देशी धमाका’ कार्यक्रमाचे आयोजन !! खान्देशी कलाकारांच्या कलाकारांच्या प्रदर्शनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध !!
डॉ.कुंदन फेगडे यांनी तरूण व युवकांनी कलाक्षेत्राकडे वळण्याचे केले अवाहन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ ऑक्टोबर २४ शुक्रवार
येथील आश्रय फाउंडेशनच्या वतीने आणि अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून खानदेशी अहीराणी सुपरस्टार्सचा ‘खान्देशी धमाका’ कार्यक्रम नुकताच यावल येथे अत्यंत उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.यावेळी खानदेशी सुपरस्टार्सला बघण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी केली होती.या कार्यक्रमाला खानदेशी सुपरस्टार सचिन कुमावत,आबासाहेब चौधरी,पुष्पाताई ठाकूरभैया मोरे,मेघा मुसळे,प्रशांत देसले,धिरज चौधरी,अशोक वानरसे,दीपक देवराज,कावेरीताई पाटील,विनोद कुमावत आणि विलास वाघ यांनी आपली कला गीत सादर केली.दरम्यान युवक-युवती,नागरीक व महिला यांनी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे प्रसिद्ध उद्योगपती कै.रतन टाटा यांच्या निधनावर त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रसंगी खानदेशी लोककलावंतांचा सत्कार भाजपाचे युवा नेते डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आला.दरम्यान यशस्वी झालेल्या कार्यक्रमाच्या आयोजनास सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे डॉ.कुंदन फेगडे यांनी विशेष जाहीर आभार मानले.या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.कुंदन फेगडे म्हणाले,आताच्या युवकांनी लोक कलांकडे जास्तीत जास्त संख्येने वळायला हवे.यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी,यावल परिसरातील नागरिक,युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान कार्यक्रम सुरू असतांना काही वेळ पाउसाच्या सरी कोसळल्या तरी पाऊस सुरू असतांना ही उपस्थित प्रेक्षकांनी या खान्देशी कलावंताच्या सुन्दर अशा कार्यक्रमाचा आनंद घेतला हे विशेष ! .