बाबा सिद्दीकींबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,बदलापूरच्या आरोपीने पोलिसांवर गोळ्या चालवल्या त्याचे प्रत्युत्तर पोलिसांनी दिले तेव्हा विरोधक विचारु लागले पोलिसांनी आरोपीवर गोळ्या का झाडल्या ? पोलिसांनी गोळ्या खायच्या का ? विरोधी पक्ष म्हणजे डबल ढोलकी आहे.बदलापूरच्या घटनेत लहान मुलीवर अत्याचार झाले त्यातल्या आरोपीची बाजू घेणारे हे विरोधक आहेत.त्यांनी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शिकवू नये तसेच बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला झाला आणि त्यात त्यांना ठार करण्यात आले त्या प्रकरणातल्या एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही.सगळ्यांना फासावर लटकवणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर रविवारी १३ ऑक्टोबरला अंत्यसंस्कार करण्यात आले.शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.या प्रकरणात गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.या दोघांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.