यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ ऑक्टोबर २४ सोमवार
येथील तहसील कार्यालयाच्या माध्यमातुन एमआरएसएसी(MRSAC) आणि राज्य मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतपिकांचे,जमिनीचे,जनावरांचे,घरांचे व गोठ्यांचे झालेले नुकसानीचे शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ भरपाई मिळण्यासाठी ई-पंचनामा हे अत्यंत उपयोगी ॲप विकसित करण्यात आले आहे.
यासंदर्भात नाशिक विभागात ५ सप्टेंबर २०२४ रोजी विभागीय कार्यालय नाशिक या ठिकाणी विभागातील महसूल,ग्रामविकास,कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.तद्नंतर दि.२०/९/२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया जळगाव येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.त्याअनुषंगाने तहसील कार्यालय यावल येथे सर्व तलाठी मंडळ अधिकारी,नैसर्गिक आपत्ती क्लर्क यांना प्रशिक्षण देण्यात आले असून आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तहसिलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी जिह्यात सर्वप्रथम ई-पंचनामा या पोर्टलवर तालुक्याचे युजर आयडी क्रिएट केला असून यामध्ये तालुक्यातील सर्व कार्यरत तलाठी यांचे युजर आयडी तयार करून घेतले आहे.या पुढे तालुक्यात नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीचे पंचनामे हे ई-पंचनामा या ॲपवरच होतील असे तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.