Just another WordPress site

महाराष्ट्राच्या निवडणुका आज जाहीर होणार !! आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार ? याची वाट राज्यातील मतदार आणि राजकीय पक्ष पाहत होते अखेर तो दिवस आला आहे.निवडणूक आयोगाने आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे.महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे तर झारखंड विधानसभेची मुदत ५ जानेवारी २०२५ रोजी संपणार आहे.त्या अनुषंगाने महाराष्ट्राची विधानसभा संपुष्टात येण्याआधी नवीन विधानसभा गठीत होणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याआधीच २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आणि निकाल पूर्ण होईल असे सांगितले होते.

Election commission press

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी २८ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखांबाबत माहिती दिली होती.ते म्हणाले होते की,आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या.स्थानिक पक्ष,राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटीगाठी घेतल्या.पोलीस महासंचालक, आयुक्त तसेच इतरांचीही भेट घेतली.आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते निर्देश दिले.आम्ही बसपा,आप,काँग्रेस,मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस एसपी,शिवसेना उबाठा,भाजपा अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली.या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला.तो महोत्सव लक्षात घेऊन निवडणूक तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी केली.निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ मतदारसंघ आहेत.महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपते आहे त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल.महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहेत.त्यात पुरुष ४.५९ कोटी मतदार आहेत तर महिला ४.६४ कोटी आहेत.आम्ही तृतीय पंथीय,वृद्ध मतदार,दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत.वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो.त्यांना केंद्रात जाणे शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल.पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे.१९.४८ लाख मतदार हे नवमतदार आहेत व हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील असेही राजीव कुमार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.