Just another WordPress site

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर !! देवेंद्र फडणवीस यांची एका शब्दातली पोस्ट चर्चेत !!

दिवाळी हे प्रकाशपर्व आहे त्यानंतर विकासाचे प्रकाशपर्व साजरे करुया-देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून इतक्या दिवसांपासून महाराष्ट्राची निवडणूक कधी जाहीर होणार ? ही तारीख गुलदस्त्यात होती.आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे.२० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे.गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल.३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.

शंखनाद ! या एका शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केली आहे.या पोस्टसह देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे.जिस गतीसे है चला तू उस गती को पायेगा.. या गाण्यावरचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे त्यात देवेंद्र फडणवीस यांचे आक्रमक अंदाज दिसत आहेत.लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या ते अपयश धुवून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस तयार आहेत असेच ते या पोस्टमधून सांगत आहेत असेच दिसून येत आहे.लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण २० नोव्हेंबरला एकत्र साजरे करू ! भाजपाच्या नेतृत्वात आपण २०१४,२०१९ ला भरभरून यश दिले संपूर्ण बहुमत दिले.चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या आणि २३ नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या ! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय अशी पोस्टही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल या दोन्हीची तारीख जाहीर झाली आहे.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक कधी जाहीर होणार ? याच्या चर्चा रंगल्या होत्या.काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत २६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल असे म्हटले होते आज अखेर या निवडणुकीची आणि निकालाच्या दिवसाची घोषणा झाली आहे.२० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घेतली जाईल तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.एकीकडे महाविकास आघाडीने १७० ते १८० जागा मिळतील असा दावा केला आहे तर महायुतीने आमचेच सरकार येईल असे म्हटले आहे.या सगळ्यामध्ये नेमके काय घडणार ते आता २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.