यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार
येथिल व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कुलमध्ये आज दि.१५ ऑक्टोबर रोजी ए.पी.जे.अब्दुल कलाम याची जयंती साजरी करण्यात आली.
प्रसंगी प्राचार्या रंजना महाजन,दिपाली धांडे यांच्या हस्ते डॉ.आब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी मुलां-मुलींनी मराठीचे वाचन केले.कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व गौरी भिरुड यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कविता पाटील यांनी केले तर माहीती भार्गव मॅडम व रुचीता मॅडम यांनी दिली तसेच आभार प्रदर्शन मनिषा पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेकरिता शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.