संजीव खन्ना हे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत.१९८३ मध्ये ते बार कौन्सिलचे सदस्य झाले होते.त्यांनी सुरुवातीला जिल्हा न्यायालयांमध्ये न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे त्यानंतर ते दिल्ली येथील उच्च न्यायालयात आणि लवादांमध्ये काम करु लागले.संजीव खन्ना यांनी प्रदीर्घ काळ सिनियर कौन्सिल म्हणून प्राप्तीकर विभागातही काम केले तसेच त्यांनी सरकारी वकील म्हणून दिल्लीतली अनेक गुन्हेगारी प्रकरणे लढवली आहेत. २००५ मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात संजीव खन्ना यांची अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून निवड करण्यात आली.त्यानंतर २००६ मध्ये संजीव खन्ना हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतानाच संजीव खन्ना यांनी दिल्ली ज्युडिशियल अॅकेडमीचे संचालक पदही भुषवले आहे.१८ जानेवारी २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड होण्याआधी फारच थोड्या लोकांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून केली जाते. संजीव खन्ना हे त्याच न्यायमूर्तींपैकी एक आहेत.जून २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत संजीव खन्ना यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे कार्यकारी अध्यक्षपदही देण्यात आले आहे.आता याच संजीव खन्ना यांची नियुक्ती सरन्यायाधीश म्हणून करण्यात यावी अशी विनंती करणारे पत्र सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी सरकारला लिहिले आहे.संजीव खन्ना यांचीच नियुक्ती सरन्यायाधीशपदी होईल याची चिन्ह आहेत कारण मावळत्या सरन्यायाधीशांनी सुचवलेल्या व्यक्तीची निवडच या पदावर होत असते व ती नियुक्ती होणे ही आता एक औपचारिकता राहिली आहे.