डांभुर्णी येथील युवतीची वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयात स्टेनोग्राफरपदी निवड झाल्याबद्दल सहपरिवारातर्फे सत्कार
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ ऑक्टोबर २४ शुक्रवार
तालुक्यातील डांभुर्णी येथील युवती कु.उज्ज्वला कैलाश पाटील हिची वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयात स्टेनोग्राफर या पदावर यशस्वी निवड झाल्याबद्दल डांभुर्णी येथील निवासस्थानी तिचा सहपरिवारातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील डांभुर्णी या गावातून तसेच खरेतर पंचक्रोशीतून न्यायव्यवस्थेमध्ये विशेषता न्यायालयात स्टेनोग्राफर या पदावर निवड होणारी कु. उज्वला पाटील ही पहिलीच मुलगी ठरली असल्याने स्वयंदीप प्रतिष्ठान आणि डांभुर्णी ग्रामस्थांना तिचा सार्थ अभिमान आहे.कु.उज्वला पाटील हिने शिक्षणातुन केलेल्या प्रगतीचे गावातील व परिसरातील स्पर्धा परीक्षा करणारे मुली-मुले यातून प्रेरणा व आदर्श घेतील अशी अपेक्षा स्वयंदीप परिवार व समस्थ डांभुर्णी गावातील ग्रामस्थ आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच सोनवणे परिवार डांभुर्णी यांनी व्यक्त केली आहे.