यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ ऑक्टोबर २४ शुक्रवार
तालुक्यातील मनवेल येथे आद्यकवी महर्षी वाल्मिक जयंती निमित्ताने खान्देशातील प्रसिद्ध केसरी ह.भ.प.किर्तीताई महाराज पाटील चोपडेकर यांच्या जाहिर किर्तनाचा कार्यक्रम २० ऑक्टोबर रविवार रोजी आयोजित करण्यात आला असुन पंचक्रोशीतील समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपास्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील मनवेल येथे महर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या किर्तनाच्या कार्यक्रमास केसरी ह.भ.प. किर्तीताई महाराज पाटील यांच्या किर्तनाचा कार्यक्रम दि.२० ऑक्टोबर रविवार रोजी रात्री साडे आठ वाजता मनवेल येथील बसस्टँण्ड जवळ आयोजीत करण्यात आला आहे.तरी साकळी सह परीसरातील भावीकांनी किर्तनाचा लाभ घ्यवा असे आवाहन मनवेल-दगडी येथील महर्षि वाल्मिक मित्र मडंळ व दगडी-मनवेल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.