नवनीत राणा यांना काही दिवसांपूर्वी १० कोटींची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र हैदराबाद येथून पाठविण्यात आले होते.गेल्या मार्च महिन्यात देखील व्हॉट्सअॅपवर एक ध्वनिफित पाठवून नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.हैदराबाद येथे लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.नवनीत राणा यांना केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची (सीआयएसएफ) वाय दर्जाची सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आता त्यांची पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी नवनीत राणा यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर जनाधार वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अमरावती मतदारसंघात मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतल्या.महिलांना साड्या आणि भेटवस्तू दिल्या त्यामुळे त्यातून राजकीय अर्थ काढले गेले पण आता नवनीत राणा या राज्यसभेवर जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.जिल्ह्यातील भाजपचे नेते डॉ.अनिल बोंडे हे राज्यसभा सदस्य आहेत.नवनीत राणा यांना संधी मिळाल्यास जिल्ह्यातील दोन नेते राज्यसभेवर प्रतिनिधित्व करतील.भाजपच्या पक्षनेतृत्वाला नवनीत राणा यांच्या कार्याबद्दलची एवढी आवश्यकता वाटत असेल यासंदर्भात नेतृत्वाला ‘फीडबॅक’ मिळाला असेल तर ते याविषयी निर्णय घेतील.नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या हालचालींविषयी प्रदेश किंवा जिल्हा स्तरावर माहिती प्राप्त झालेली नाही.पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात,तो भाजपचे कार्यकर्ते मान्य करतात असे शिवराय कुळकर्णी,प्रदेश प्रवक्ते,भाजप यांनी नमूद केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.