दरम्यान राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अदिती तटकरेंची पोस्ट शेअर करत या योजनेबद्दल मोठे विधान केले असून  राज्यातील महिलांनी भूलथापांना बळी पडू नये असे ते म्हणाले.या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्याने अतिशय जबाबदारीने  सांगतो,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही.माझ्या भगिनींना,मायमाऊलींना विनंती आहे की, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये अशी पोस्ट अजित पवार यांनी एक्सवर केली आहे.महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली व या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली आहे.आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाले आहेत.जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले.