प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की सुप्रीम कोर्टाने एससी,एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअर हा निर्णय लागू करण्यासाठी एका निवृत न्यायाधीशाची नेमणूक केली आहे.बार्टीच्या एका अधिकाऱ्याला सचिव म्हणून नेमण्यात आले आहे व त्यांचा अहवाल हा सादर केला जाईल अहवाल एकदा सादर झाला की सुप्रीम कोर्टाचा उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरचा निर्णय लागू होईल.वंचितचे प्रमुख म्हणाले,हा निर्णय लागू झाला तर एससी एसटी त्या अधिकाऱ्यांच्या मुलाला मुलीला आणि कुटुंबाला आरक्षण मिळणार नाही हे त्यांनी समजून घ्यावे आरक्षण वाचवणे हा निवडणुकीचा मुद्दा आपण केला पाहिजे म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःचे ५० हजार रुपये खर्च केले पाहिजेत.निवडणुकीत प्रचार करण्यासाठी किंवा मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी कशा पद्धतीने वळवायचे याची आपल्याला अधिक जाणीव आहे.उद्याचे आमदार निवडून आले तर हा निर्णय अंमलबजावणी करण्यापासून थांबवता येतो म्हणून तमाम फुले शाहू आंबेडकवादी विचाराच्या अधिकाऱ्यांना आवाहन करतोय की आपण या निवडणुकीमध्ये आपल्या पदरचे पन्नास हजार रुपये खर्च करून आपल्या मुलाबाळांचे आरक्षण वाचवा असे आवाहन मी करत आहे.वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन हे आरक्षण आपण वाचवाल ही अपेक्षा.