“भाजपाशी हातमिळवणी करणे म्हणजे…” !! अमित शाह यांच्याशी भेट झाल्याच्या चर्चांवर संजय राऊतांचे स्पष्टीकरण !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;-
दि.२१ ऑक्टोबर २४ सोमवार
राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.जागावाटपाबाबत राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू असून यावरू आरोप-प्रत्यारोप,टीका-टिप्पणी देखील सुरु झाली आहे.अशात भाजपाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.दरम्यान आज किंवा उद्या इतर पक्षांच्या उमेदवारांची यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे व महत्त्वाचे म्हणजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांनीही जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर केलेले नाही त्यामुळे राजकीय चर्चांनीही उधाण आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत विदर्भातील १२ जागांवरून मतभेद आहेत व यातील काही जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे.मात्र काँग्रेस या जागा सोडायला तयार नाही.जागावाटपाचा हा तिढा आता दिल्लीत पोहोचला आहे.महाराष्ट्रातील काही नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत तर दुसरीकडे राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडी देखील स्थापन करण्यात आली आहे.या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे.याबाबत आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.एकंदरित राज्यातील राजकीय घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे.दरम्यान संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून या चर्चांवर आता संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले असून संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाली हा हास्यास्पद प्रश्न आहे.या शक्तींशी सगळ्यात जास्त कुणी संघर्ष केला असेल तर तो शिवसेनेने केला आहे.त्यांनी आमचा पक्ष फोडला.आमचे सरकार पाडले.आमचे चिन्ह चोरले आणि त्यापेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हाती दिला त्यामुळे जर कुणी अशी शंका घेत असेल तर ते एका बापाच्या औलादी नाहीत.महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही व त्यांच्याशी हातमिळवणी करणे म्हणजे औरंगजेबाशी हातमिळवणी करण आहे असे संजय राऊत म्हणाले.