राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर  झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून २९ ऑक्टोबर या दिवसांपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे.शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपारून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.या पार्श्वभूमीवरच शरद पवार,उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत.आज महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.