यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि.२८ ऑक्टोबर २४ सोमवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी व वनविभाग कर्मचारी सारंगधर आढाळे यांचे वडील तसेच डोंगर कठोरा तलाठी कार्यालयातील कोतवाल विजय सारंगधर आढाळे यांचे आजोबा कालकथित यशवंत माधव आढाळे यांचे काल दि.२७ ऑक्टोबर रविवार रोजी वयाच्या ९४ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.सदरहू त्यांची अंत्ययात्रा आज दि.२८ ऑक्टोबर सोमवार रोजी ठीक ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.लहान-थोरांचे प्रेमळ असे व्यक्तिमत्व असलेले कालकथित यशवंत माधव आढाळे यांच्या निधनाबद्दल परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कालकथित यशवंत माधव आढाळे यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.यशवंत आढाळे हे वनविभाग कर्मचारी सारंगधर आढाळे यांचे वडील तसेच डोंगर कठोरा तलाठी कार्यालयातील कोतवाल विजय सारंगधर आढाळे यांचे आजोबा तर अंगणवाडी सेविका आशा सारंगधर आढाळे यांचे सासरे आहेत.