एकनाथ शिंदेंच्या नावे असणाऱ्या ३७ कोटींहून अधिकच्या संपत्तीमध्ये ९ कोटी २१ लाख ७८ हजार १५० रुपये मूल्य असणारी जंगम मालमत्ता तर २८ कोटी ४६ लाख ८० हजार रूपये मूल्य असणारी स्थावर मालमत्ता आहे याच प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदेंवर ९ गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्याशिवाय त्यांचे शिक्षण एमए झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.दरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे.यानिमित्ताने महाराष्ट्रात आणखी एक काका-पुतणे आमने-सामने उभे ठाकल्याचे दिसून येत आहे.केदार दिघेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या नावे एकूण संपत्ती १ कोटी २० लाख ५६ हजार २५५ रुपये मूल्याची आहे त्यात ६५ लाख ५६ हजार २५५ रुपये मूल्याची जंगम मालमत्ता आहे.केदार दिखे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांच्यावर २ गुन्हे दाखल आहेत.दरम्यान मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्यानावे एकूण मालमत्ता १६ कोटी १६ लाख रुपये मूल्याची आहे त्यात १ कोटी २९ लाखांची स्थावर तर १४ कोटी ८७ लाखांची जंगम मालमत्ता आहे.अमित ठाकरे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसून त्यांनी व्यवस्थापन शाखेची पदवी पूर्ण केली आहे.