अमरावती पोलिसांकडून चोरट्यांनी चोरलेला ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
अफलातून कामगिरी करणाऱ्या फ्रेजरपुरा पोलिसांचे सर्वत्र कौतूक
दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख :-
कॅम्प परिसरातील एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सुरूवातीला तक्रारीत नमूद होते.मात्र सोन्याचे दागिने अडीचशे ग्रॅमपेक्षा जास्त असून २० लाखांची रोखसुध्दा चोरट्यांनी पळवल्याचे दोन दिवसानंतर समोर आले.दरम्यान तरुणीने तिच्या प्रियकराला माहीती दिल्यानंतर ही चोरी झाल्याच्या प्रकार उघडकीस आला व फ्रेजरपुरा पोलिसांनी त्या तरुणीसह दोन चोरट्यांना अटक केली आहे.पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराकडून २७७ ग्रॅमचे दागिने व २० लाखांची रोख आज दि.१४ ऑक्टोबर २२ रोजी जप्त केली आहे.दरम्यान आयुक्तालयात अलीकडच्या काळात असे पहिल्यांदाच घडले असून एकाच गुन्ह्यात एकाचवेळी सुमारे ३१ लाख रुपयांची ‘रिकव्हरी’ पोलिसांनी केली आहे ही अफलातून कामगिरी करणाऱ्या फ्रेजरपुरा पोलिसांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
शोएब खान मंजूर खान (वय 23, रा. ताजनगर),शेख जुबेर शेख ताज (वय 31, रा. सुफियाननगर) आणि शेख जुबेरची प्रेयसी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.विश्रामगृहासमोर असलेल्या गुलीस्ता अपार्टमेंटमध्ये सैय्यद झिया उर रहेमान (वय ३८)यांच्या घरात चोरी करुन चोरट्यांनी २५० ग्रॅम सोन्यासह २० लाखांची रोख लंपास केली होती.सैय्यद झिया उर रहेमान यांची शहरातीलच निकटची नातेवाईक असलेल्या १९ वर्षीय तरुणीने तीचा प्रियकर शेख जुबेरला नातेवाईकाच्या घरातील दागिने व रोखबाबत माहीती दिली.शोएब खान व शेख जुबेर यांनी चोरी करुन संपुर्ण चोरीचा ऐवज जुबेरकडे ठेवला होता.पोलिसांनी त्याच्या घरातून २७७ ग्रॅम दागिने व २० लाखांची रोकड जप्त केली आहे.जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ११ लाख ८ हजार रुपये,७० हजारांची चोरीत वापरलेली कार व २० लाख रोख असा सुमारे ३१ लाख ७८ हजारांचा ऐवज फ्रेजरपुरा पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ.आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर,पीआय नितीन मगर,पीआय निशीकांत देशमुख,पीएसआय गजानन राजमल्लू,निलेश जगताप,शशीकांत गवई,विनोद काटकर यांनी केली आहे.