काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेस सदसत्वासह सर्व पदांचा राजीनामा
वरिष्ठ नेत्याच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का
दिल्ली – पोलीस नायक (वृत्तसेवा) :- काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा नुकताच दिला आहे त्यामुळे काँग्रेसला मोठाच धक्का बसला आहे. गुलाम नबी आझाद हे गेल्या काही दिवसापासून पक्षाच्या राजकारणावर नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या अखेर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून आपल्या काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा नुकताच दिला आहे.गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना राजीनाम्याचे पत्र पाठविले आहे.त्यात अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावुक अंतःकरणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबतचे माझे ५० वर्षाचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे तसेच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढून आधी काँग्रेसला जोडावे असा सल्लाही त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
गुलाम नबी आझाद यांनी आपल्या राजीनामा पत्रात राहुल गांधी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील सर्व जेष्ठ अनुभवी नेते काँग्रेसमध्ये पूर्णपणे बाजूला सारले गेले आहेत व अनुनभवी नेत्यांवर पक्षाचा कारभार पाहण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यामुळे सातत्याने काँग्रेसला निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर २०१४ पासून आजपर्यंत ४९ विधानसभा निवडणुकांपैकी ३९ विधानसभांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे व २०१४ पासून दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.काँग्रेसमध्ये चांगले बोलणाऱ्यांचा अपमान केला हि निंदनीय बाब आहे. आज काँग्रेसची फारच दयनीय स्थिती असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.मी जाड अंतःकरणाने काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेससोबतचे माझे अनेक दशके जुने नाते तोडण्याचा निर्णय मोठ्या खेदाने घ्यावा लागला.भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढून आधी काँग्रेसला जोडायला हवी असा मोलाचा सल्लाहि गुलाम नबी आझाद यांनी पक्षपदाधिकाऱ्यांना दिला आहे.
गुलाम नबी आझाद यांचा पक्षामध्ये अत्यंत जेष्ठ व स्रेष्ठ नेत्यांमध्ये समावेश होता.तसेच ते गांधी घराण्याच्या अत्यंत जवळच्या नेत्यांपैकी मानले जात होते.परंतु हि सर्व जबाबदारी सोडून गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे व त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मोठाच धक्का बसला आहे.