“सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनणार का ? बाबत आदित्य ठाकरे यांची स्पष्टोक्ती
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ ऑक्टोबर २४ गुरुवार
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही परंतु अंतर्गत वर्तुळात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेंच सुरू असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा आहे यावर सर्व प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले ते एबीपी न्यूजच्या शिखर संमेलनात बोलत होते.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होऊ शकतात असे सूचक विधान शरद पवार आणि जयंत पाटील यांनी याच कार्यक्रमात केले होते.महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री नाही झाली असे विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले,महिला मुख्यमंत्री झाल्या किंवा नाही झाल्या हे होत राहते हा राजकारणाचा भाग झाला पण सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडत जात आहे. भाजपाची संस्कृती महाराष्ट्रावर लादली जात आहे पण मुख्यमंत्री पदाबाबत जनता ठरवेल.महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणारा मुख्यमंत्री होणार असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले,आमच्या सर्व सर्वेक्षणात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंवर अनेकांनी विश्वास ठेवला आहे.शेतकरी,महिला,विद्यार्थी,डॉक्टर,आशा सेविका यांच्यासह अनेक उद्योगपतींचेही आमच्या सरकारवर विश्वास होता व त्यांना माहित होते की हा माणूस आम्हाला फसवणार नाही,आम्हाला लुटणार नाही.ही लढाई आमच्या अस्तित्वाची नाही.पक्ष खरा की खोटा याची नाही.ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मिता आणि अस्तित्वाची आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची ही लढाई आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.“भाजपा महाराष्ट्राची राखरांगोळी करायला जात आहे. राख महाराष्ट्रात ठेवून रांगोळी गुजरातला घेऊन जात आहे” अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.