मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ ऑक्टोबर २४ गुरुवार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजी नगर येथून उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केलाय त्यामुळे महायुतीतील वाद समोर आलाय.नवाब मलिकांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे तसेच नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध असल्याचेही भाजपा नेते म्हणत आहेत यावरून नवाब मलिकांनी भाजपाच्या नेत्यांना इशारा दिला असून टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.“दाऊदशी संबंध असल्याचे माझ्यावर जे आरोप करतात त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे.गुन्हेगार,दहशतवादाचा कोणताही खटला माझ्यावर नाही.जे लोक माझ्यावर असे आरोप करत त्यांच्याविरोधात मी वरच्या न्यायालयात धाव घेणार आहे.मी बदनामीचा खटला टाकणार आहे.हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत” असे नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांविरधात भूमिका घेतली आहे तसेच दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नाही असे भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले होते.भाजपाच्या या नेत्यांवर नवाब मलिकांनी टीका केली.ते म्हणाले,कितीही मोठा नेता असला तरीही मी कायदेशीर कारवाई करणार आहे.माझ्या प्रचाराला या असा मी आग्रह करत नाही.जनतेचे पाठबळ माझ्या पाठीशी आहे.या आधारावर निवडणूक लढतो.दाऊदचे नाव माझ्याशी जोडणाऱ्यांवर कायदेशीर करणार आहे.मी माझ्या विचारधारेला कधीही सोडणार नाही.