यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच विज्ञान मंडळाचे उद्घाटन यावल पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एन. बढे यांच्याहस्ते झाले.यावेळी सरस्वती माता प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे होत्या.या कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे, डॉ. पी. व्ही.पावरा,प्रा. मयूर सोनवणे आदी उपस्थित होते.प्रारंभी विज्ञान मंडळाचे चेअरमन प्रा. एम. डी. खैरनार यांनी प्रास्ताविकात विज्ञान मंडळाची भूमिका विशद केली.यावेळी उद्घाटक डॉ. बढे यांनी विज्ञानवादी विद्यार्थी हा चिकित्सक व तर्कज्ञानी असतो तसेच जिद्द व चिकाटीने विद्यार्थ्याला यश सहज गाठता येते.ध्येयवादी विद्यार्थी कधीही अपयशी होत नाही असे भाषणात नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी समस्या ही संशोधनाची जननी आहे.विज्ञानातील संशोधनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती जोपासली जाते.विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती बाळगली पाहिजे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. डी. पवार यांनी केले.तर आभार डॉ.एच.जी. भंगाळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.