२९ ऑक्टोबर रोजी जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता तोपर्यंत महायुतीमधील ५० नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवले होते त्यापैकी ३६ उमेदवार हे महायुतीचे होते यातही भाजपाचे सर्वाधिक १९ उमेदवार आहेत तर त्यापाठोपाठ शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे १६ उमेदवार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा केवळ एकच बंडखोर आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मागच्या आठवड्यात दिल्ली येथे झालेल्या बैठकीत महायुतीमधील बंडखोरांची समजूत काढण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिली होती.

महायुतीकडून ३६ बंडखोर

भाजपा विरुद्ध शिवसेना ९ मतदारसंघ-ऐरोली,अंधेरी पूर्व,पाचोरा,बेलापूर,फुलंब्री,कल्याण पूर्व,विक्रमगड,सोलापूर शहर

शिवसेना विरुद्ध भाजपा १० मतदारसंघ-मेहकर,बुलढाणा,सावंतवाडी,जालना,पैठण,घनसावंगी,अलिबाग,कर्जत,मिरा-भाईंदर

राष्ट्रवादी विरुद्ध शिवेसना ७ मतदारसंघ-पाथरी,बीड,वाई,अनुशक्तीनगर,देवळाली,दिंडोरी आणि खेड आळंदी

राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा ९ मतदारसंघ-अहेरी,अमळनेर,अमरावती,पाथरी,शहापूर,जुन्नर,उदगीर,कळवण,आळंदी

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी १ मतदारसंघ-नांदगाव (नाशिक) या मतदार संघांचा समावेश आहे.