Just another WordPress site

पत्नीने प्रियकराच्या मदतीने जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीचा काढला काटा

लातूर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

लातूरमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.यामध्ये एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीची हत्या केली आहे.दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅनॉलमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता.यानंतर लातूर पोलिसांनी अधिक तपास केला असता मृत व्यक्ती हा देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे सदरील मृत व्यक्तीचे नाव अरविंद पिटले असे आहे.ते त्याच्या पत्नीसह लातूर शहरातील ठाकरे चौकात राहत होते.मृत अरविंद पिटले हे बेपत्ता असूनही त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार का दिली नाही?म्हणून तिच्यावर पोलिसांना संशय आला यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा मान्य केला.

देवणी तालुक्यात एका ठिकाणी कामाला असताना मृत अरविंदची पत्नी आणि घरणी येथील रहिवाशी असलेला सुभाष शिंदे या दोघांची ओळख झाली यानंतर सुभाष शिंदे हा अरविंदच्या घरी ये-जा करू लागला.सुभाष आणि अरविंदच्या पत्नीची भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले यानंतर गावात या गोष्टीची चर्चा सुरु झाली.यानंतर सुभाष शिंदे गोड बोलून अरविंद आणि त्याच्या पत्नीला लातुरात घेऊन आला त्याने  या दाम्पत्याला खोली करून दिली.त्यानंतर सुभाष शिंदे आणि अरविंदच्या पत्नीला अधिकच मोकळेपणा मिळाला.यानंतर दोघांनाही अरविंदचा अडथळा होऊ लागल्याने दोघांनी अरविंदचा काटा काढायचे ठरवले.यानंतर ते जेवायच्या निमित्ताने दुचाकीवरून औसा येथील एका धाब्यावर गेले यानंतर त्या दोघांनी बाभळगाव परिसरातील एका कॅनॉलजवळ अरविंदचे हातपाय बांधून गळ्यातील गमचाने गळा आवळून त्याचा खून केला.त्यानंतर एका पिशवीत दगड भरून ती मयताच्या कमरेला बांधून कॅनॉलच्या पाण्यात मृतदेह टाकण्यात आला.या सगळ्यात मृत अरविंदचा मोबाईल त्याच्या खिशातच राहिला.त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांना अधिक सोपे झाले.यानंतर लातूर ग्रामीण पोलिसांनी मृत अरविंदची पत्नी आणि तिचा प्रियकर सुभाष शिंदे यांना अटक केली असून पुढील तपास लातूर पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.