उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री झाले हे सर्वांना माहिती आहे.सध्याच्या काळात काहीही विचारधारा उरलेली नाही.२०१९ नंतर कोणाचे सरकार येणार ? हेच आपण पाहत बसलो होतो.एकेदिवशी सकाळी ६ वाजता कळले की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत आहेत.आधी तर विश्वासच बसला नाही.आर्धा तास ते लग्न टिकले. आर्ध्या तासाच घटस्फोट झाला त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले मग यांना काही जणाची नाही आणि मनाची नाही.ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर सत्तेत जाऊन बसले.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक बॅनर्सवरील नावापुढंचे हिंदूहृदयसम्राट हे नाव काढले.हे का काढले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाईट वाटेल आणि त्यांना ते परवडणारे नाही तसेच काही उर्दू बॅनर्सवर जनाब बाळासाहेब ठाकरे नाव टाकले.आज ते हयात असायला हवे होते.त्यांनी एकएकाला फोडून काढले असते” असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.आज काही मौलवी फतवे काढत आहेत.काय फतवे काढत आहेत ? तर सर्वच्या सर्व मते हे महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकावी.जर ते फतवे काढत असतील तर आज मी देखील फतवा काढतो.येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझे ज्या मतदारसंघात उमेदवार असतील तेथे जनतेने आमच्या पाठीशी उभे राहावे.उद्या सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या ४८ तासांत सर्व मशिदीवरचे भोंगे पहिल्या पहिल्या ४८ तासांत खाली उतरवले ना ? तर परत राजकारण सांगणार नाही.जर त्यांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर हे आमच्या खाकी वर्दीतले आहेत ना त्यांना आदेश देईल आणि ते रजा अकादमीचा बदला घेऊन टाकतील असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.