लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने संविधानासाठी लढून महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला होता त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हा बाबासाहेबांचा अपमान कधीही सहन करणार नाही.लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीला समर्थन देतील आणि आपल्या संविधानावरील प्रत्येक हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊन त्याचे रक्षण करतील अशी प्रतिक्रियाही राहुल गांधी यांनी दिली आहे.