गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी !! तेलंगणा,हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर !!
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वतंत्र तेलंगणाचे आश्वासन पूर्ण केले.विधानसभा निवडणुकीच्या वेळी सहा आश्वासने दिली होती.तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली.महाराष्ट्रात सांगण्यासारखे एकही काम भाजपने केलेले नाही म्हणून ते आमच्यावर टीका करून जनतेची दिशाभूल करीत आहेत असे रेवंथ रेड्डी,मुख्यमंत्री,तेलंगणा यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून लोकांच्या समस्या समोर आल्या त्यातून कर्नाटकात सहा गॅरंटी देण्यात आल्या.काँग्रेस सत्तेत येताच त्याची अंमलबजावणी केली.१ कोटी २२ लाख महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा २००० रुपये मिळत आहेत.१ कोटी ६४ लाख कुटुंबे ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत.कर्नाटकात आम्ही केलेले काम भाजप नेत्यांनी पहावे,त्यांच्यासाठी विशेष विमान,बसची सोय करू असे डी.शिवकुमार,उपमुख्यमंत्री,कर्नाटक यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रासारखेच हिमाचल प्रदेशातही ऑपरेशन कमळचा प्रयोग झाला पण काँग्रेसने त्यांचा डाव हाणून पाडला.जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली.काँग्रेसचे सरकार येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुनी निवृत्तिवेतन योजना लागू केली.दुधाला हमीभाव देणारे हिमाचल प्रदेश देशातील पाहिले राज्य आहे असे सुखविंदर सुख्खू,मुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे.