यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० नोव्हेंबर २४ रविवार
रावेर-यावल विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा दुसखेडा-कठोरा-कासवा-अकलूद प्रचार दौरा नुकताच संपन्न झाला असून या प्रचार दौऱ्यादरम्यान धनंजय चौधरी यांच्या प्रचार रॅलीला ग्रामीण क्षेत्रातुन मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.दरम्यान तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत असून मतदारसंघातील शेतकरी,कष्टकरी,महिला आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी तसेच रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी “हाताचा पंजा” या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याची विनंती केली.
आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून अकलुद फाटा ते दुसखेडा पेपरमिल डांबरीकरण रस्ता,अकलुद ते आमोदा रस्ता डांबरीकरण तसेच कासवा येथे संत गजानन महाराज मंदिराजवळ सभामंडप बांधकाम व गावाअंततर्गत काँक्रीटीकरण असे विविध विकास कामे झालेली आहेत.अडीच वर्षे महायुती सरकारने कामे थांबविल्यामुळे निश्चितच काही कामे राहुन गेलेले आहेत ते पूर्ण करेल असा विश्वास गावकऱ्यांना दिला.यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.