Just another WordPress site

यावल तालुका कृषी कार्यालयात फळपीक विमा योजना तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न

स्वयंचलित हवामान केंद्राची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करणार-तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची माहिती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० नोव्हेंबर २४ रविवार

तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या मे महिन्यात सतत बदलत्या तापमानामुळे मोठे नुकसान झाले होते व असे असतांना देखील पिक विमा कंम्पनीकडून मात्र केळी पिकाचे नुकसान होवुन देखील यावल महसूल मंडळ त्यातुन वगळण्यात आले होते.स्वयंचलित हवामान यंत्राकडून सदोष नोंदी गेल्यामुळे शेतकरी नुकसान होऊन देखील नुकसान भरपाई पासून वंचित राहिल्याचा आरोप करीत याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. दरम्यान काल शुक्रवारी यावल येथील कृषी कार्यालयात तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक तहसीलदार मोहनमाला नासीरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यात स्वयंचलित हवामान केंद्राची पाहणी करण्यात आली व या बैठकीचा स्वयंस्पष्ट अहवाल जिल्हाधिकारीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच सदर अहवाल विमा कंपनीकडे पाठवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भातील शिफारस करण्याचा निर्णय या तक्रार निवारण समितीत घेण्यात आला.

दरम्यान संपूर्ण यावल तालुक्यात मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तापमान होते आणि तालुक्यातील सर्वच महसूल मंडळ केळी पीक विम्यात पात्र ठरले.शेतकऱ्यांचे केळीचे नुकसान झाल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना विम्याचा लाभ जाहीर झाला मात्र यावल महसूल मंडळात तापमानांची सलग पाच दिवस व्यवस्थित नोंदच झाली नाही. स्वंयचलीत यंत्रणेमुळे नोंद होऊ शकली नाही व नुकसान होऊन देखील शेतकरी विमा पासून वंचित राहिला अशी तक्रार शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती.या तक्रारीची तात्काळ दखल घेत काल शुक्रवारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,समितीचे सचिव तालुका कृषी अधिकारी भरत वारे,विमा कंम्पनीचे प्रतिनिधी व तक्रारदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक घेण्यात आली.या बैठकीत उपस्थितांनी यावल महसूल मंडळाचे स्वयंचलित हवामान यंत्र असलेल्या मोहराळा या ठिकाणी जाऊन पाहणी केली व या केंद्राच्या संर्दभातील स्वयंस्पष्ट अहवाल आणि पंचनामा करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व शेतकऱ्यांना कशाप्रकारे या विम्याचा लाभ मिळेल यासाठीची शिफारस तक्रार निवारण समितीकडून केली जाणार आहे.सदर बैठकीत प्रगतीशील शेतकरी कृष्णाजी नागराज पाटील,भगतसिंग पाटील,अर्जुन पाटील,सारंग बेहडे,योगेश वाणी,राजेश श्रावगी,डॉ.निलेश गडे,डॉ.स्वर्णदीप सिंह, पंढरीनाथ इंगळे सह शेतकरी बंधूंची उपस्थिती होते.

स्वयंचलित हवामान केंद्र परिसराचा करण्यात आला पंचनामा.
यावल महसूल मंडळाचे स्वयंचलित हवामान यंत्र हे मोहराळा या गावाजवळ लावण्यात आले असून या स्वयंचित हवामान यंत्राच्या परिसरात केळी पिकाची लागवड आहे तसेच परिसरात मोठमोठे झाडे आहेत म्हणून तापमानाची व्यवस्थित नोंद झाली नसावी असा प्राथमिक अंदाज तक्रार निवारण समितीने लावला आहे व तसा अहवाल देखील आपण पाठवणार असल्याचे समितीच्या वतीने बैठकीत ठरविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.