Just another WordPress site

तब्बल २७ वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात शाळा आठवणींना उजाळा !!

यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१० नोव्हेंबर २४ रविवार

तालुक्यातील चिंचोली येथील सार्वजनिक विद्यालय शाळेत २७ वर्षानंतर सन १९९६-९७ या वर्षीच्या इयत्ता बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक व्ही.एस.पाटील होते.प्रसंगी माजी मुख्याध्यापक एम.एच.पाटील,एन.आर.पाटील,जे.एस.पाटील तसेच भाऊसाहेब एकनाथ पाटील आणि सध्याचे प्राचार्य के.एस.पाटील उपस्थित होते.आपल्या शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मिलिंद बडगुजर,प्रा.प्रमोद जाधव,निशा पाटील यांनी केले.दीपक मिस्तरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आणून हा सुवर्णयोग घडवून आणण्याचे महत्तम कार्य केले.

सदर कार्यक्रमाला सुरत,नंदुरबार,धुळे,मुंबई,पुणे,नाशिक अशा सर्व ठिकाणाहून ५० विद्यार्थी मित्र-मैत्रिणी आलेले होते.प्रसंगी अनेक विद्यार्थी मनोगत व्यक्त करतांना भाऊक झाले.दरम्यान नम्रता भांडारकर,डॉ.मंगला पाटील,सुकलाल कोळी,राज्य शासन आदर्श ग्रामसेवक मज्जीत तडवी,सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम तडवी, चुडामन बडगुजर,जगदीश पाटील यांनी बालपणातील गमतीजमती सांगितल्या.सदर कार्यक्रमाच्या शिक्षक मनोगतमध्ये एम.एच.पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले विद्यार्थी आपल्यापेक्षा पुढे गेल्याचे समाधान व्यक्त केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.प्रा.मिलिंद बडगुजर यांच्या शेरो शायरीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमा नंतर सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रमाच्या शेवटी अनेकांनी आपल्या विविध नकला,कला सादर केल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला सरस्वतीची मूर्ती भेट दिली आणि भावी काळामध्ये दरवर्षी दहा गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमास सोनिया पाटील,आदर्श ग्रामसेवक विजय साळुंके,चिंचोली गावाचे पोलीस पाटील राकेश पाटील,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळुंके,ज्योती साठे,रंजना साठे,वंदना साठे,सीमा चांदसरे,नलिनी धनगर,अनिता पाटील,अर्चना पाटील,ज्योती पाटील,राजेंद्र सोनावणे,अनिल धनगर,विलास पाटील,धनंजय साठे,धनराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील,सुधीर पाटील,जगदीश पाटील,हिरामण पाटील,जहांगीर तडवी,रहमान तडवी,फकीरा तडवी,प्रशांत पाटील,सुनील शिंपी,भालेराव अण्णा,संजय बाविस्कर, नन्नवरे सर,संतोष हिरवळकर तसेच,आडगाव,किनगाव व चिंचोली गावातील माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.