राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले होते.राज्यातील अनेक नेत्यांनाही आमंत्रण होते परंतु राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी हे आमंत्रण नाकारून सोहळ्यात गैरहजर राहिले यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांवर टीकाही केली आहे.या टीकेची नक्कल करत उद्धव ठाकरे म्हणाले,नरेंद्र मोदी म्हणतात की,अरे भाई और बेहनो मैं पुछना चाहता हूँ की उद्धव ठाकरे राम मंदिर क्यू नहीं गए.अरे भाई वो गळ रहा है ना.वो गळनेका थांबेगा तो मैं जाएगा कारण तुम्ही घाई घाई में उसका उद्घाटन केल्या” असे हिंदी मराठी भाषेचा मिलाप करत उद्धव ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली त्यांच्या या टिप्पणीनंतर सभामंडपी एकच हशा पिकला.ते पुढे म्हणाले,प्राणप्रतिष्ठेवेळी आजूबाजूला एकही शंकाराचार्य नाही.सगळे भष्ट्राचारी बसले होते.ते सगळे भ्रष्टाचार्य.गळत्या राम मंदिरात जाऊ नका हे शं‍कराचार्यांनीही सांगितले आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.