महायुतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धुळे,नाशिक,अकोला,नांदेड,चिमूर,सोलापूर,पुणे,संभाजीनगर,रायगड,मुंबई अशा दहा सभा झाल्या.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचा किल्ला लढविला याशिवाय योगी आदित्यनाथ,राजनाथ सिंग यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात सहभागी झाले होते.काँग्रेसमध्ये राहुल गांधी,प्रियंका गांधी,मल्लीकार्जुन खरगे आदी नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपापल्या पक्षांच्या प्रचारासाठी दररोज किमान चार तरी सभा घेतल्या.प्रचारात नेहमीच आरोप-प्रत्यारोपांचा राळ उठते पण यंदा प्रचाराची पातळी खालावली.शेवटच्या टप्प्यात नेतेमंडळींच्या हेलिकॉप्टर आणि गाड्यांची तपासणी वादात सापडली.

दशसूत्री विरुद्ध पंचसूत्री

महायुतीने गॅरंटीची ‘दशसूत्री’ दिली तर त्याला महाविकास आघाडीकडून ‘पंचसूत्री’ सादर करून प्रत्युत्तर देण्यात आले.लाडकी बहीण योजनेवर महायुती व महाविकास आघाडीने जाहीरनाम्यांमध्ये भर दिला.महायुती आणि महाविकास आघाडीचे संयुक्त जाहीरनामे जाहीर करण्यात आले मात्र शिवसेने (शिंदे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांनी आपले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले नाहीत.