यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ नोव्हेंबर २४ सोमवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी लीलाधर रामा सरोदे यांची मुलगी नम्रता हीचा विवाह काल दि.१७ नोव्हेंबर रविवार रोजी होता परिणामी या विवाह सोहळ्याला स्वामीनारायण संप्रदाय स्वीकारून भगत या पदावर असलेले राकेश भगत हे आपल्या बहिणीच्या लग्नाला आलेले होते.दरम्यान बहिणीच्या विवाहाच्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी सकाळी २ वाजता राकेश भगत यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.परिणामी राकेश भगत यांच्या निधनामुळे स्वामीनारायण संप्रदाय व सरोदे परिवारावर एकच शोककळा पसरली असून त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान राकेश भगत यांनी वयाच्या अवघ्या १०-१२ वर्षांपासून संसाराचा त्याग करून स्वामीनारायण मंदिर वडतावल (गुजरात) येथे स्वामीनारायण संप्रदायाचा स्वीकार केला होता व त्यांचे गुरु शास्त्री हरी प्रकाश हे होते.बहिणीचे लग्न असल्यामुळे या कार्यक्रमाला राकेश भगत हे तालुक्यातील डोंगर कठोरा येथील स्वामीनारायण मंदिरात आलेले होते व मंदिरातच अचानक त्यांना दि.१७ रविवार रोजी सकाळी २ वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांचा यावेळी मृत्यू झाला.दरम्यान “बहिणीच्या विवाहाच्या दिवशीच भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू” हि घटना अखिल मानवाच्या काळीजाला चटका लावणारी असून सदरील घटनेमुळे स्वामीनारायण सांप्रदाय व सरोदे परिवारासह परिसरात एकच शोककळा पसरली आहे.तर स्वामीनारायण सांप्रदायाच्या वतीने काल १७ रविवार रोजी स्वामीनारायण सांप्रदायानुसार राकेश भगत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.