Just another WordPress site

यावल वन वनविभागाच्या कार्यवाहीत दोन लाख रूपयांची गावठी दारू नष्ट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ नोव्हेंबर २४ सोमवार

वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून यावल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र पाडले कक्ष क्र.१ आणि २ मध्ये गंगापुरी धरण परिसरात वन विभागाने केलेल्या धडक कारवाईत राखीव वनातून ५ अवैध गावठी दारूभट्ट्या नष्ट करण्यात आल्या.सदर कार्यवाहीत ७ मोठे ब्यारेल,२०५ लहान ब्यारेल यांच्यातील ४४७५ लिटर गावठी दारू (कच्छी दारू) अंदाजित किंमत १ लाख ५६ हजार सहाशे रुपये तसेच होंडा कंपनीची एमपी १२ एमए MA ७५८३ नंबरची मोटार सायकल व इतर साहित्य असा दोन लाख रुपयांच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नाशवंत मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याचे वन विभागाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

दरम्यान जप्त व नष्ट मालाचा तपशील पुढील प्रमाणे असून यात एकूण ५ भट्टयांवर कच्च्या दारूचे रसायन अंदाजे ४४७५ लीटर किंमत १५६६२५ रूपये किमतीच्या गावठी तयार दारु ३९ लीटर किंमत ३९००,भट्टीसाठी लागणारे इतर साहित्य किमत अंदाजे ३०२०० व जप्त मोटार सायकल यांची एकूण अंदाजे रक्कम २९ हजार अशा एकुण जप्त व नष्ट केलेल्या मालाची एकूण रक्कम २ लाख १९ हजार ७२५ रूपये नाशवंत मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.सदरहू वनरक्षक पाडले खुर्द यांचे कडील प्रं.रि.क्र.०६/२०२४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास वणपाल(आहिरवाडी )करीत आहेत.सदरील कारवाई ही मा.वनसंरक्षक (प्रा.), धुळे वनवृत्त श्रीमती निनु सोमराज,उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख,सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्प) यावल समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजय बावणे वनक्षेत्रपाल रावेर,वनरक्षक सुपडू सपकाळे,जगदीश जगदाळे,सविता वाघ,आयेशा पिंजारी,मंगला बारेला,संगीता बारेला,कियारसिंग बारेला,आकाश बारेला,निलेश बारेला,थावऱ्या बारेला,वाहन चालक विनोद पाटील,वनमजूर युनूस तडवी यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.