येत्या २० तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे व ही निवडणूक रोहिणी खडसे लढत आहेत.मी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.मी गेली अनेक वर्ष आपल्या बरोबर आहे.आपणही मला सहकार्य केले.तुमच्या सुख आणि दुःखात देखील मी सहभागी झालो.कोणताही धर्म आणि जात न पाहता मी आतापर्यंत मदत करण्याची भूमिका निभावली पण तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक मी पाहील की नाही ? हे इश्वरच ठरवेल कारण पुढच्या निवडणुकीत मी असेन किंवा नसेन पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करतो की,रोहिणी खडसे या निवडणुकीत उभ्या आहेत.आपण मला जसे सहकार्य केले तसे रोहिणी खडसे यांनाही सहकार्य करा अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी जनतेला घातली आहे.महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे.या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.खरे तर राज्यात युती आणि आघाडीच्या राजकारण सुरु आहे त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पहायला मिळणार असून निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.मात्र यातच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मोठी घोषणा करत आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे यासंदर्भातील व्हिडीओ देखील त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.