यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ नोव्हेंबर २४ मंगळवार
तालुक्यातील वनपरिक्षेत्र चोपडा अंतर्गत नियतक्षेत्र सत्रासेन उ.कक्ष क्र. २७९ मध्ये पिपऱ्यापानी नाला परिसरामध्ये अवैध दारु हातभट्टीवर आज दि.१९ नोव्हेंबर रोजी अचानक धाड टाकून तेथील १ हजार लिटर दारूचे कच्चे रसायन व दारू पाडण्याचे साहित्य असे ऐकून अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला.सदर घटनेचा वनगुन्हा नोंदवला असुन आरोपींचा शोध सुरु आहे.
सदरील कारवाई मा.वनसंरक्षक धुळे वनवृत्त श्रीमती निनु सोमराज,उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख,विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे,राजेंद्र सदगिरयांचे मार्गदर्शनाखाली प्रथमेश हाडपे (सहाय्यक वनसंरक्षक चोपडा),बी.के.थोरात (वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा) यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
या कारवाईत वनपाल आर.एस.मोरे,जे.पी.सूर्यवंशी,पी.ए.सोनवणे,वनरक्षक श्रीमती सीमा भालेराव,सरला भोई सोनाली पावरा,उज्वला बारेला,अनिता पिंकी कोठारी, शालिग्राम कंखरे,रोहित पावरा,संदीप पावरा,जनार्दन गुट्टे,ओमल पाटील,प्रवीण बागुल,शुभम पाटील,प्रकाश पाटील,वनसेवक भुरसिंग पावरा,रतिलाल भिल,रवी भिल, विकी राजपूत,वाहन चालक गोविंदा चौधरी,मनोज मोरे इ.कर्मचारी कारवाईत सहभागी होते.