“विनोद तावडेंना सोडून दिले !! एका खोलीत १० लाख !! दुसऱ्या खोलीत पाच लाख..” !! हितेंद्र ठाकूर यांचे वक्तव्य
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ नोव्हेंबर २४ मंगळवार
विनोद तावडेंवर बविआने पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे व यामुळे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये राडा सुरु असून याप्रकरणी विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषद सुरु केली होती मात्र ही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली.राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने पत्रकार परिषद घेता येणार नाही असे सांगण्यात आले यानंतर आता विनोद तावडेंना आम्ही सोडून दिले त्यांच्याकडे बोलायला आहेच काय ? असे म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी नवा आरोप केला आहे. विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते व ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला.ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले.बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली.काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली.यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले.तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली.सध्या पोलिसांनी हॉटेल सील केले आहे.यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली.विनोद तावडेंनी सदरचे आरोप फेटाळले आहेत मात्र हितेंद्र ठाकूर यांनी नवे आरोप केले आहेत.
विनोद तावडे यांच्याकडे बोलायला काही आहे का ? पैसे वाटप किंवा मिटिंग करायची असते का ? पोलिसांनी आमची पत्रकार परिषद थांबवली आहे.कारण निवडणूक आयोगाने सांगितले,आता हे सगळे अडचणीत येईल भाजपाच्या त्यामुळे सांगण्यात आले की आचारसंहिता असल्याने पत्रकार परिषद घेता येणार नाही.हे कुठल्या आचारसंहितेत लिहिले आहे.उलट माध्यमांनी याचा निषेध नोंदवला पाहिजे असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.हितेंद्र ठाकूर पुढे म्हणाले,डीसीपी मॅडम म्हणाल्या की पत्रकार परिषद थांबवा आम्ही थांबवली.माझ्यावर कुठलाही दबाव वगैरे काहीही नाही.काही प्रश्नच येत नाही.कुणाच्या बापाचे प्रेशर मी घेत नाही.पैसे मोठ्या प्रमाणावर आहेत. मला त्यांनी ५० फोन केले,आता आहे ते मिटवा,आपण मित्र आहेत.जाऊ द्या विनोद तावडेंना सोडून दिले.एका खोलीत १० लाख,कुठे दोन लाख,कुठे पाच लाख असे पैसे मिळाले आहेत.कुठे किती पैसे मिळाले ते पोलिसांना विचारा.पैसे काय माझे होते का ? मतदानाच्या ४८ तास आधी सगळ्या नेत्यांनी बाहेर जायचे असते.विनोद तावडे इकडे आले कसे ? आमचे आरोप विनोद तावडे सहन करु शकत नाही त्यामुळे ती पत्रकार परिषद थांबवली असेही हितेंद्र ठाकूर म्हणाले.