Just another WordPress site

उरलीसुरली अब्रू १७ तारखेला काढणार ! निलेश राणे यांचा भास्कर जाधव यांना इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

भाजप नेते किरीट सोमय्या यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आमच्यावर आकसापोटी गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप भास्कर जाधव यांनी केला होता.याबाबत भाजप नेते निलेश राणे यांना विचारले असता त्यांनी यावरून भास्कर जाधव यांच्या वर निशाणा साधला आहे.भास्कर जाधवला आम्ही कार्टूनच म्हणतो त्यांची उरलीसुरली अब्रू १७ तारखेला काढणार!असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना निलेश राणे म्हणाले,भास्कर जाधव आणि विनायक राऊत ही बाद झालेली माणसे आहेत.नकल करण्याशिवाय ते दुसरे काही करू शकत नाही.भास्कर जाधवला आम्ही कार्टूनच म्हणतो.आणि विनायक राऊत यांना किती अक्कल आहे हे आम्ही सांगायची गरज नाही.१७ तारखेला आपण भास्कर जाधवच्या चिपळूण मध्ये जाहीर सभा घेऊन त्यांची उरली सुरली अब्रू काढणार असा थेट इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे.

दरम्यान संख्याबळ गेले की हे सरकार पडेल असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते  याचाही निलेश राणे यांनी समाचार घेतला.सगळीच सरकारे संख्यबळावर असतात.अजित पवार यांचा विरोधी पक्षनेते म्हणून प्रभाव पडत नाही राज्यात विरोधी पक्षनेता आहे की नाही हेच कळत नाही म्हणून ते अशी वक्तव्ये करत असतात असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.