“माझ्यावर दगड मारा किंवा गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही” !! रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अनिल देशमुखांचा सत्ताधाऱ्यांना इशारा !!
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ नोव्हेंबर २४ मंगळवार
राज्याचे माजी गृहंमत्री आणि राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला.काटोल मतदारसंघासोबत नागपूर व राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटल्या आहेत.महाविकास आघाडीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मतदानाच्या काही दिवसाआधी असा हल्ला होणे याबाबत चिंता व्यक्त केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस क्षाचे राष्ट्री अध्यक्ष शरद पवार,पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे,काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.दरम्यान त्यांना रुग्णालयातून आता सोडण्यात आले आहे.रुग्णालायतून बाहेर येताच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.सोमवारी रात्री हल्ला झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.डिस्चार्ज मिळताच त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले,“माझ्यावर दगड मारा किंवा गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही. मी सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.”
अनिल देशमुख यांच्यावरच्या हल्ला प्रकरणात चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काटोल या ठिकाणी अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास करणे सुरु आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्यावर जो हल्ला झाला ते प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे.चार अज्ञातांविरोधात आम्ही हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी विशेष पोलीस निरीक्षकांनी भेट दिली आहे.तांत्रिक पुरावेही गोळा केले जात आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आहे.जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.कायदा-सुव्यवस्थेचा भंग करण्यात आला तर कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.