मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार
राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून महाराष्ट्रात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज मतदानाला सुरुवात झाली आहे.राज्यात आज मतदान पार पडत असून सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदार आपला मतदानाचा हक्का बजावू शकणार आहेत.प्रत्येकाला आपला विकास करणारा लोकप्रतिनिधी निवडण्याची महत्त्वाची संधी मतदानाच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेने उपलब्ध करून दिलीय त्यामुळे हा आपला सर्वोच्च हक्क बजावणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.अशातच मराठी शाळेतल्या एका पाटीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ प्रत्येकाला विचार करायला भाग पाडेल.
शाळा ही केवळ एक वास्तू नव्हे ती देशाचे भविष्य असलेल्या बालकांची मानसिक-शारीरिक जडणघडण करणारी एक संस्थाच.मात्र याच मराठी शाळेची आज परिस्थिती सर्वानाच माहिती आहे.आपुल्या घरात हाल सोसते मराठी’ असाच काहीसा प्रकार आजकाल पाहायला मिळत आहे त्याचे कारण म्हणजे मराठी शाळांकडे फिरवली जाणारी पाठ.मराठी शाळा,विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येत मोठी घसरण होत आहे.तुलनेत पालकांचा कल हा इंग्रजी शाळांकडे असल्याचे चित्र आहे.आपण जरी मराठी शाळेकडे पाठ फिरवत असलो तरी मात्र हीच मराठी शाळा आपल्यासाठी कायम उभी असते.प्रत्येक मतदानाला मराठी शाळा मतदानासाठी मतदान बूथ उपल्बध करुन देते.मतदानाच्या कामावेळी प्रत्येकाला मराठी शाळेची आठवण येते अशाच एका मराठी शाळेतील पाटीने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
या मराठी शाळेतल्या फळ्यावर “मतदानासाठी का होईना आमचे मराठी शाळेकडे वळले पाऊल…सरकार कोणाचे का असेना पण तेथुनच,चालु होऊ दे विकासाचे पहिले पाऊल” असा मजकूर लिहला आहे हे वाक्य प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडणारे आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ dale__________arts_007 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.एकाने म्हटलय, “शिक्षणासाठी चांगल्या गुणवत्तेच्या शाळा पाहीजेत,private schools नी पालकांचे कंबरडे मोडत आहे,शिक्षण हा business झाला आहे.तर आणखी एकाने “अगदी बरोबर आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.