मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली.यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते.यावेळी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवर सुद्धा चर्चा झाल्याची शक्यता आहे.अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार उतरवला आहे.शिंदे गटाचा त्यांना पाठिंबा आहे.अंधेरी मतदारसंघात मराठी मतेही भरपूर आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे भाजप-शिंदे गटाला पाठिंबा देणार का?हे सुद्धा पाहावे लागणार आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांची भाजप आणि शिंदे गटासोबत जवळीक वाढली आहे.यापूर्वीही एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन घेतले होते.त्यांनतर राज ठाकरे वर्षावर गेले होते.त्यातच मुंबई महापालिका निवडणूकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते.त्यामुळे महाविकास आघाडीला शह देण्यासाठी शिंदे गट-भाजप आणि मनसे तिघेही एकत्र येणार का?अशा चर्चाना उधाण आले आहे.